Monetize your site! CHEFS Sale: SAVE 60% + FREE Shipping on Wusthof Gourmet 12-Piece Block Set CHEFS Catalog: Gift Ideas for the Gadget Guru

Marathi Jokes


1 Marathi doctor jokes - पहिलं बाळ

एक माणूस फोनवर डॉक्टरांशी जिवाचा आटापिटा करुन सांगत होता, '' डॉक्टर माझी बायको गरोदर आहे, आणि तिच्या प्रसववेदना सुरु झालेल्या असून तिच्या डिलेव्हरीसाठी फक्त दोन मिनीट बाकी आहेत.''

'' हे तिचं पहिलं बाळ ना?'' डॉक्टरांनी विचारले.

'' मुर्खा!'' तो माणूस ओरडला, '' मी तिचं बाळ नाही तिचा नवरा बोलतोय!''


2 Marathi mental hospital jokes - हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

जिम आणि मेरी दोघंही मेंटल हॉस्पीटलमधे पेशंट होते. एक दिवस ते जेव्हा हॉस्पीटलच्या स्विमींग पुलशेजारुन चालत होते तेव्हा जिमने एकाएकी स्विमींग पुलमधे उडी मारली. स्विमींग पुल खुप खोल असल्यामुळे तो बुडून स्विमींग पुलाच्या एकदम तळाशी गेला. मेरीने हे सगळं पाहालं आणि तिने ताबडतोब त्याला वाचवण्यासाठी स्विमींग पुलमधे उडी मारली. ती पोहत तळाशी गेली आणि तिने जिमला धरुन वर आणले आणी स्विमींग पुलाच्या बाहेर काढले.

जेव्हा मेडीकल ऑफीसरला मेरीची ही करामत कळली त्याने ताबडतोब मेरीला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याची ऑर्डर दिली. कारण ती जर एवढं शहानपणाने वागुन जिमला पाण्यातून बाहेर काढून वाचवू शकते म्हणजे ती आता मानसिकरित्या दुरुस्त झाली असं समजायला काही हरकत नव्हती.

जेव्हा तो मेडीकल ऑफिसर मेरीला भेटायला गेला तेव्हा म्हणाला, '' मेरी माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे... चांगली बातमी ही आहे की तुझी ती जिमला वाचवण्याची कामगीरी पाहून आम्ही तुला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याचे ठरविले आहे... आणि वाईट बातमी ही आहे की तु ज्याला वाचवले होते त्या जिमने स्वत:च्या गळ्याला फास लावून आत्महत्या केली आहे...''

मेरीने उत्तर दिले, '' नाही त्याने गळ्याला फास लावला नाही... मीच त्याला वाळवण्यासाठी टांगले होते.''

3 Marathi Vinod - किती वाजले?

सरदार (एका माणसाला) : ओए एक्सुज मी, किती वाजले ?

आदमी : बारा वाजले. .

सरदार : अरे यार, किती विचित्र गोष्ट आहे, मी हा प्रश्न आज जवळपास तिस वेळा विचारला, पण प्रत्येक वेळी प्रत्येक जणांनी वेगवेगळं उत्तर दिलं.

4 Marathi science jokes - रिलेटीव्हीटी

जेव्हा तुम्ही एखाद्या सुंदर मुलीच्या सहवासात वेळ घालवता तेव्हा एक तासही एका सेकंदाप्रमाणे जाणवतो, पण जेव्हा तुम्ही लाकुड जळून लाल लाल झालेल्या कोळश्यावर बसता तेव्हा तुम्हाला एक सेकंद एखाद्या तासाप्रमाणे जाणवतो -- यालाच रिलेटीव्हीटी म्हणतात.